Latest Political News Update | केजरीवलांनी सोडले BJP वर टिकास्त्र पहा पूर्ण बातमी | Lokmat News

2021-09-13 0

भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. जातीय दंगली घडवा व राज्य करा, असे भाजपचे धोरण असल्याची घणाघाती टीका दिल्‍लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. राष्‍ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२० व्या जन्‍मोत्‍सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने केजरीवाल सिंदखेड राजा येथील संकल्‍प सभेत मातृतीर्थावरून बोलत होते. राज्य व केंद्रातील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्‍वप्‍नांचा चुराडा केला आहे. भाजपमध्ये देशद्रोही, दंगेखोरांचा समावेश आहे. जातीयवादी राजकारणामुळे महाराष्‍ट्राचे मोठे नुकसान होत आहे. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires